मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सुलतान अर्थात अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) आपल्या अभिनय आणि व्यक्तीमत्वाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करत आहे. सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटाची (Salman Khan Movie) त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचे हे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कामगिरी करतात. सलमान खानच्या चित्रपटांनी एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. सलमानच्या चाहत्यांची क्रेझ अशी की ते त्याची एक झलक पाहण्यासाठी ते हतबल होतात. यावेळी सलमान खानच्या क्रेझची वेगळी झलक समोर आली आहे.Also Read - Ajay Devgan च्या मेव्हणीनं चांगल्या चांगल्यांची केली सुट्टी, फोटोवरून हटणार नाही तुमची नजर!

सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Askahy Kumar) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांचा 2004 साली प्रदर्शित झालेला ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपट (Mujhse Shaadi Karogi Movie) खूपच सुपरहिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटातील सलमान खानचे ‘जीने के हैं चार दिन’ या गाण्याला (Jine Ke Hai Char Din Song) देखील प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. या गाण्यात सलमान खानने टॉवेलसोबत (Salman Khan Towel) डान्स केला आहे. त्याने वापरलेल्या या टॉवेलचा आता लिलाव झाला आहे. महत्वाचे म्हणजे, लाखो रुपयांना हा टॉवेल विकला केला आहे. Also Read - Krishna Shroff bold Photo: जॅकी श्रॉफच्या कन्येनं ऐन पावसाळ्यात वाढवलं तापमान, उघडलं जीन्सचं बटण

Salman Khan Towel

Salman Khan Towel

‘जीने के है चार दिन’ या गाण्यामधील सलमानच्या डान्स स्टेप्सची (Salman Khan Dance Step) देखील खूप चर्चा झाली होती. त्या गाण्यात सल्लू भाईने टॉवेलसह एक अप्रतिम स्टेप देखील केली होती. आजही त्याची ही डान्स स्टेप त्याचे चाहते करत असतात. पण आता त्या टॉवेलचा लिलाव झाला आहे. तब्बल 1,42,000 रुपयांना हा लिलाव झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा पैसा चॅरिटीसाठी वापरला जाणार आहे. Also Read - Big B Romantic Post: बिग बींनी जया बच्चनसोबतचा रोमँटिंक फोटो केला शेअर, म्हणाले - '49 वर्षांपूर्वी झालं होतं प्रेम'

बॉलिवूड लाईफने दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमानच्या टॉवेलशिवाय अनेक गोष्टीचा लिलाव करण्यात आला आहे. यापैकी ‘देवदास’ चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Actress Madhuri Dixit) घातलेला लेहेंगा, शाहरुखचा (Shah Rukh Khan) डूडल, अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘ओह माय गॉड’ चित्रपटातील सूट आणि ‘लगान’ या सुपरहिट चित्रपटातील आमिर खानच्या (Aamir Khan) बॅटचा लिलाव करण्यात आला आहे.