मुंबई : बिग बॉसच्या 13 व्या सीझनचा विनर (bigg boss winner) आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Actor Siddharth Shukla) गुरुवारी निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे (Heart Attack) सिद्धार्थचे निधन झाले. सिद्धार्थच्या निधनामुळे बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. पण सर्वात मोठा धक्का बसला ते म्हणजे त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाज गिलला (Shehanaz gill). शहनाज या दु:खातून सावरत नाहीये. कालपासून शहनाजचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. अशामध्ये शहनाजचा एक व्हिडिओ (Viral Video) देखील समोर आला आहे तो पाहून तुमचेही मन हेलावून जाईल.Also Read - PHOTOS: Siddharth Shuklaच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या Shehnaaz Gillचे रडून रडून झाले असे हाल!

Also Read - Sidharth Shukla Passed Away: व्हायरल होतेय सिद्धार्थ शुक्लाची अखेरची पोस्ट, 'या' लोकांचे मानले आभार!

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज सतत रडत आहे. सिद्धार्थच्या नावाचा सतत जप करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शहनाज रुग्णवाहिकेच्या (Ambulance) दिशेने धावाताना दिसत आहे. या रुग्णवाहिकेमध्ये सिद्धार्थचे पार्थीव (Siddharth Death Body) ठेवलेले आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज सिद्धार्थला जोर जोरात हाक मारताना दिसत आहे. 10 सेकंदाचा हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट (Twitter Post) करण्यात आला असून तो खूप व्हायरल होत आहे. Also Read - Bigg Boss च्या घरात फुललं होतं सिद्धार्थ आणि शेहनाजचं प्रेम, या जोडीला चाहत्यांनी दिलं होतं 'हे' नाव!

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शहनाचा भाऊ शाहबाज (Shehanaz Brother) देखील दिसत आहे. तो शहनाजला सिद्धार्थच्या घरी घेऊन आला होता. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याचे म्हटले जात होते. पण कधीच दोघेही या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाहीत. सिद्धार्थ आणि शहनाज यांचे प्रेम बिग बॉसच्या (Bigg Boss) घरामध्ये फुलले होते. दोघांच्याही चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडत होती. त्यांनी तिला ‘सिडनाज’ असे नाव दिले होते.

सिद्धार्थ आणि शेहनाजला बिग बॉसमुळेच प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यानंतर देखील दोघे एकत्र फिरायचे. एका अल्बममध्ये दोघे झळकले होते. हे व्हिडीओ साँग खूपच लोकप्रिय झाले होते. सिद्धार्थ आणि शेहनाजची केमिस्टी त्यात दिसली होती. चाहत्यांकडून या अल्बमला भरभरून पसंती मिळाली होती.