नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Second Wave Of Corona) ओसरत असली तर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत (Corona Patient) वाढ झाल्याची दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे. 47 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. गणेशोत्सव (Ganesh Festival 2021) तोंडावर आला आहे. त्यात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave Of Corona) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2021) आणि दिवाळीसाठी (Diwali 2021) नियमावली (Festival Corona guidelines) जाहीर करण्यात आली आहे. यंदा देखील नागरिकांनी घरात बसूनच सण साजरे करावे, असं आवाहान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करम्यात आले आहे.Also Read - Ganesh Chaturthi 2021: पुण्यातील मानाचे 5 गणपती... जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

सध्या कोरोनाव्हायरसच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे देशात केरळ (Kerala) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या राज्यात गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी सणाच्या दरम्यान गर्दी टाळण्यासाठी सरकारतर्फे नियमावली जाहीर करण्यात आली आहे. Also Read - Ganesh Chaturthi 2021 Wishes: गणेश चतुर्थीला तुमची प्रत्येक इच्छा होईल पूर्ण; मित्र नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा

कोव्हिड-19 टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल (Dr.V.K.Poll) आणि आयसीएमआरचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव ( Dr.Balram Bhargav) यांनी पत्रकार परिषद घेत गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांना गर्दी टाळण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. Also Read - PHOTO: बीडला मुसळधार पावसाने झोडपले, हाता तोंडाशी आलेले पिक वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत!


डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले, गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र आणि ईद हे सण पुढील दिवसांत येत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सण, उत्सव साजरे करण्याची गरज आहे. म्हणजेच घरात बसूनच सण साजरे करावे, असं पॉल यांनी आवाहन केलं आहे. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणं ही अट घालून देण्यात आली आहे.

कोरोनाचा कहर अद्याप ओसरला नाही. रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालण करून योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही देखील संयम दाखवून गर्दी टाळाली, असं आवाहन डॉ. पॉल यांनी केले आहे.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना सुरक्षित राहावे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस घेणं महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. नागरिकांनी जागरुक व्हायला हवं. त्याचप्रमाणे शहरी भागात लसीकरण योग्य रित्या होत. मात्र, ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दुर्गम भागातही लसीकरण झालं पाहिजे. देशात आतापर्यंत केवळ 16 टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. 54 टक्के नागरिकांचं अंशत: लसीकरण झालं आहे.