मुंबई : गणेशभक्त दरवर्षी गणेशोत्सव सणाची (Ganesh Chaturthi 2021) आतुरतेने वाट पाहत असता. गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण सर्वांचा आवडता असून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या सणाच्या प्रत्येक दिवशी गणपत्ती बाप्पाची मनोभावाने पुजा केली जाते. यावर्षी गुणेश चतुर्थी 2021चा उत्साह 10 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला (Ganpati Bappa) आपल्या घरी आणले जाते त्याची मनोभावाने पुजा केली जाते. जर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणण्याचा विचार करत असाल तर गणेश मूर्ती स्थापनेचा (Ganpati Sthapana 2021) आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त (Ganesh Visarjan Shubh Muhurta) घ्या जाणून…Also Read - Ganesh Chaturthi 2021: कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडून मोठी घोषणा

गणेश मूर्तीची स्थापना करण्याची शुभ वेळ (Ganpati Sthapana Sbhubh Muhurt) –

गणेश चतुर्थी सण शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 रोजी आहे. या दिवशी जर तुम्ही शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना केली तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. पूजेची शुभ वेळ दुपारी 12:17 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही 10 सप्टेंबरला रात्री 12 वाजल्यानंतर कोणत्याही वेळी गणेश मूर्तीची स्थापना आणि पूजा करू शकता. Also Read - Night Curfew In Ganesh Festival: राज्यात नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता

गणपती विसर्जनाची वेळ (Ganesh Visarjan) –

गणपती बाप्पाची 10 दिवस मनोभावाने सेवा केल्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणपती बाप्पाचे विसर्जन देखील वाजत गाजत केले जाते आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष केला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत चालू राहील. Also Read - Ganpati Sthapana Muhurta 2021: या शुभ मुहूर्तावर करा गणेशाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या वेळ आणि मंत्र

सकाळी मुहूर्त – दुपारी 7:39 ते 12:14 वाजेपर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 वाजेपर्यंत
संध्याकाळी मुहूर्त- संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46 वाजेपर्यंत
रात्रीचा मुहूर्त – मध्यरात्री 1:43 ते 3:11 वाजपर्यंत (20 सप्टेंबर)
सकाळी मुहूर्त – सकाळी 4:40 ते दुपारी 6:08 वाजेपर्यंत (20 सप्टेंबर)