मुंबई : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya 2021) असे म्हणतात. या वर्षी पिठोरी अमावस्या 6 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. पिठोरी अमावास्येला सोमवती अमावस्या (Somvati Amavasya 2021) आणि दर्श अमावस्या (Darsh Amavasya 2021) देखील आहे.Also Read - Bail Pola 2021: बैल पोळा का असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस? काय आहे महत्त्व आणि परंपरा?

पिठोरी अमावस्या 2021 शुभ मुहूर्त (Pithori Amavasya 2021 Shubh Muhurta)

अमावस्या तिथीची सुरुवात – 06 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 07:38 पासून
अमावस्या तिथी समाप्ती – 07 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 06:21 वाजता Also Read - Pithori Amavasya 2021: काय आहे पिठोरी अमावस्येचे महत्त्व; पितृ दोषापासून मुक्त होण्यासाठी केले जातात हे उपाय

पिठोरी अमावस्येचे महत्त्व (Pithori Amavasya Importance)

पिठोरी अमावस्येच्या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून बनवल्या जातात. या दिवशी महिला व्रत ठेवतात आणि त्यांची पूजा करतात. या अमावस्येला पिठापासून बनवलेल्या देवींची मूर्तींची पूजा केली जाते, त्यामुळे या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. Also Read - Pola Festival 2021: असा साजरा करतात बैल पोळा; जाणून घ्या महत्व आणि पौराणिक कथा

पितृ दोषापासून मुक्त होण्यासाठी केले जातात उपाय

या अमावास्येच्या दिवशी नदी स्नान आणि दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. स्नान केल्यानंतर पित्रांच्या तृप्तीसाठी पिंडदान, तर्पण इत्यादी विधी केले जातात. पितृ दोषापासून मुक्त होण्यासाठी पूर्वजांच्या आत्म्यांना संतुष्ट करणे आवश्यक आहे. या अमावस्येला पितृ दोषापासून मुक्त होण्यासाठी उपाय केले जातात. आपले पित्र आनंदी असतील तर आपले कुटुंब देखील सुखी राहते असे मानले जाते. असे केल्याने जीवनात प्रगती होते आणि वंशची वृद्धी होते अशी मान्यता आहे. (Pithori Amavasya 2021 Pithori Amavasya is celebrated on this day; Learn auspicious time and importance Pithori Amavasya importance in marathi)