मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2020 (MPSC Exam) येत्या 4 सप्टेंबर म्हणजे शनिवारी घेण्यात येणार आहे. एमपीएससीच्या परिक्षार्थींसाठी (MPSC Student) रेल्वे प्रासनाने (Railway Administration) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या परिक्षार्थींना रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवासाची (Local Travel) मुभा दिली आहे. त्यामुळे उद्या त्यांना लोकलने प्रवास करता येणार आहे. भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister of State Raosaheb Danve) यांच्याकडे याबाबत मागणी केली होती.Also Read - Money Laundering Case: अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून लुकआउट नोटीस जारी

एमपीएससीची परीक्षा (MPSC Exam) देणाऱ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, तसंच ते वेळेत परीक्षा केंद्रावर (Exam Center) पोहचावेत यासाठी परीक्षार्थींना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) एमपीएससीच्या परीक्षार्थींना त्यांचे हॉल तिकीट (Hall Tickets) दाखवून त्यांना लोकल तिकिट (Local Tickets) खरेदी करुन प्रवास करता येईल असे सांगितले आहे. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. Also Read - Breaking News Live Updates: गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करा; मुख्यमंत्र्यांचं पक्ष-संघटनांना आवाहन

हे नियम पाळावे लागणार –

– परिक्षार्थीची थर्मल गनद्वारे तापमान तपासणी होणार
– मास्क वापरणे आवश्यक
– परिक्षार्थीच्या ओळखीचा पुरावा आवश्यक
– स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईलवर बंदी
– पुस्तक, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर वापरास बंदी Also Read - Breaking News Live Updates: राजू शेट्टींच्या आंदोलनाची सरकारकडून दखल!; पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर उद्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. पण अचानक ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यातील कोरोनाचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी संतप्त झाले होते. राज्यातील विविध ठिकाणी रस्त्यावर उतरुन या विद्यार्थ्यांनी आंदोलनं (MPSC Student Protest) करत सरकारच्या (Maharashtra Government) निर्णयाचा निषेध केला होता.