मुंबई : मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस (Rainfall) पडत आहे. दडी मारलेल्या पावसाचे (Maharashtra Monsoon Update) पुन्हा आगमन झाल्यामुळे शेतकरी (Farmer) आनंदीत झाले आहेत. अशामध्ये पुढच्या चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall in Maharashtra) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD alert) वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोकण (Kokan), मराठवडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidharbha) काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.Also Read - PHOTO: बीडला मुसळधार पावसाने झोडपले, हाता तोंडाशी आलेले पिक वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत!

येत्या 48 तासांत उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात (Bay of North Central Bengal) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Heavy Rainfall) पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेवटच्या दिवसांत सर्वात जास्त पाऊस मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यात पडेल असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K S Hosalikar) यांनी देखील ट्वीट करून माहिती दिली आहे. Also Read - Beed Rain Update: अतिवृष्टीचा बीडला मोठा फटका, 6 जणांचा मृत्यू तर घरासह शेतीचे मोठे नुकसान

कोकणच्या रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत पुढील तीन ते चार तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Also Read - Breaking News Live Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सव काळात जमावबंदीचे आदेश