मुंबई: अकोला जिल्ह्यात (Akola District) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ महिन्यांच्या एका चिमुरडीला एचआयव्ही संक्रमीत रक्त (HIV infection blood) दिल्याचा तिच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले, अकोला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. अत्यंत धक्कादायक घटना आहे. निष्काळजीपणामुळे चिमुरडीच्या जीवाला धोका आहे. या प्रकरणात दोषी आढळून आलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आरोग्यमंत्र्यांनी जालन्यात सांगितलं.Also Read - Ganesh Chaturthi 2021: पुणे शहारात जमावबंदीचे आदेश; 144 कलम लागू, कोरोनाचा धोका कायम

काय आहे प्रकरण?

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील (Murtijapur) हिरापूर येथील एका आठ महिन्यांच्या चिमुरडीला पांढऱ्या पेशी कमी झाल्यानं तिला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान तिला देण्यात आलेलं रक्त एचआयव्ही संक्रमण (HIV infection blood) होतं. त्यामुळे चिमुरडीचा एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा आरोप चिमुरडीच्या नातेवाईकांनी केला आहे. Also Read - Breaking News Live Updates: राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेना, काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर; आजी माजी आमदारांनी मांडल्या तक्रारी

या रक्तपेढीतून आणलं होतं रक्त..

मूर्तिजापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये चिमुरडीवर उपचार सुरू असताना तिला रक्ताची आवश्यकता आहे, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. अकोला येथील बी. पी. ठाकरे रक्तपेढीतून रक्त आणण्याचा सल्ला चिमुरडीच्या नातेवाईकांना देण्यात आला होता. ठाकरे रक्तपेढीतून आवश्यक रक्त आणून ते चिमुरडीला देण्यात आला. परंतु, तरी देखील चिमुरडीचा ताप कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं पाहून तिला अमरावती येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. Also Read - Breaking News Live Updates: आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरे उघडायची का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

चिमुरडीचा एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह…

अमरावती येथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना चिमुरडीला एचआयव्ही असल्याचा संशय आला. त्यांनी तिची एचआयव्ही तपासणी करण्यास सांगितलं असता तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. चिमुरडीच्या आई-वडिलांना देखील एचआयव्हीची तपासणी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. मात्र, दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आई-वडील निगेटिव्ह असताना मुलगी पॉझिटिव्ह आली कशी? असा सवाल उपस्थित झाल्यानंतर चिमुरडीला एचआयव्ही संक्रमीत रक्त दिल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

आरोग्य विभागाकडून एक समिती गठीत

आरोग्य विभागाकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान जे दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एका संक्रमित व्यक्तिचे रक्त चिमुकलीला देण्यात आले. याची आता आरोग्य विभागाकडून चौकशी होणार आहे.