मुंबई : टोक्यो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. भारतीय खेळाडूंनी (Indian Players) शनिवारी नेमबाजीमध्ये आणखी दोन पदकांची कमाई केली आहे. भारताच्या 19 वर्षीय नेमबाज मनीष नरवाल (Manish Narwal) याने सुवर्ण पदक पटकावले. तर 39 वर्षीय सिंहराज अधाना (Singhraj Adhana) याने नेमबाजीमध्ये रौप्य पदक (Silver Medal) पटकावले आहे. मनीष नरवालने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरे सुवर्ण पदक (Gold Medal) मिळवून दिले आहे. मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना या दोन्ही खेळाडूंचे कौतुक होत आहे.Also Read - Tokyo Paralympics 2020: कृष्णा नागरने सुवर्ण कामगिरी करत रचला इतिहास, भारताच्या खात्यात पाचवं सुवर्णपदक!

Also Read - Tokyo Paralympics 2020: IAS अधिकारी सुहास यथिराज यांची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदकावर कोरलं नाव!

मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी पी4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल एसएच1 नेमबाजीमध्ये (Shooting) दमदार कामगिरी केली आहे. दोघांनीही अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य अशी पदकं भारताला मिळवून दिली आहेत. पात्रता फेरीत सिंहराज 536 गुणांसह चौथ्या, तर मनीष नरवाल 533 गुणांसह सातव्या स्थानावर होता. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये 39 वर्षीय सिंहराजने हे दुसरे पदक मिळवले आहे. यापूर्वी त्याने 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 मध्ये कांस्यपदक मिळवले होते. Also Read - Tokyo Paralympics: कौतुकास्पद! अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्णनंतर कांस्य पदकावर कोरले नाव

दरम्यान, टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 15 पदकं भारताला जिंकून दिली आहे. यामध्ये 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वी नेमबाज अवनी लखेरा (avani lekhara) (महिला 10 मीटर एअर रायफल एसए1) आणि सुमित अँटिल (पुरुष भालाफेक एफ64) यांनी भारताला सुवर्ण पदकं जिंकून दिली आहेत. संपूर्ण देशभरातून भारताला पदकं मिळवून देणाऱ्या या खेळाडूंचे खूपच कौतुक होत आहे.